मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी यांनी घेतल्या होत्या. यावेळी केंद्रात रस्ते, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीपद भूषवणाऱ्या नितीन गडकरी यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केलं. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं अत्यावश्यक असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.

देशाचे जागरूक नागरिक म्हणून तुम्ही कुणालाही मत द्या, पण मत द्या असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. प्रत्येक नागरिकाने न घाबरता मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन गडकरी यांनी केले. गडकरींप्रमाणेच सर्वपक्षीय नेत्यांकडून सुद्धा सारख्याच सूचना आज दिवसभरात मतदारांना देण्यात आल्या.

Leave a Comment