परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी लिहीलेली “बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा” जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात दि.23 मार्च रोजी घेण्यात आली. आता ही प्रतिज्ञा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर नियमितपणे घेतली जाणार आहे .गुरुवार 24 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी, अधीक्षक अंधारे, बालकल्याण समिती अध्यक्ष केकान, चाईल्ड लाईनचे संदीप बेडसुरे, निरीक्षण गृह अधिक्षक घुगे, संरक्षण अधिकारी व्ही.पी.नागरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आजपासून परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ही प्रतिज्ञा राष्ट्रगीत झाल्यानंतर नियमीतपणे घेतली जाणार आहे तसेच प्रत्येक ग्रामसभेच्या पुर्वी व विविध राजकीय तसेच प्रशासकीय सभांच्यावेळी घेतली जाईल. असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शालेय विद्यार्थीनींनी बालविवाह मुक्ती करिता “सर्वांचा एकच नारा , बालविवाहमुक्त करू परभणी जिल्हा सारा.” घोषणा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी भिमनवार, अर्चना मनतकर, महेश साळुंके, अनिल कांदे, तालुका संरक्षण अधिकारी व बालसंरक्षण कक्ष आदींनी परिश्रम घेतले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.