Pm Awas Yojana घर बांधण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाखांपर्यंत अनुदान; पहा पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Pm Awas Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक माणसाची आयुष्यात अनेक स्वप्न असतात. त्यातीलच एक सगळ्यात मोठे स्वप्न असते ते म्हणजे स्वतःचे घर. प्रत्येकाच्या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःचे घर हे नेहमीच पहिल्या स्थानी येते. परंतु आत्ताची वाढती महागाई पाहता त्याचप्रमाणे सगळ्या गरजा पाहता हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अनेकवेळा लोक कर्ज घेतात आणि जमीन खरेदी करतात. परंतु त्यावर घर मात्र बांधू शकत नाही. परंतु आता तुमच्या स्वप्नातले हे घर बांधण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार आहे.

केंद्र सरकारने आजपर्यंत नागरिकांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत. ज्याचा फायदा नेहमीच नागरिकांना झालेला आहे. आणि यातीलच एक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम आवास योजना. (Pm Awas Yojana) या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो लोकांनी स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून लाभार्थ्यांना त्यांचे कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जर तुम्हालाही तुमचे असे स्वप्नातले घर बांधायचे असेल, आणि त्यासाठी पैसे कमी पडत असेल, तर तुम्ही सरकारच्या या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता.

केंद्र सरकारच्या या पीएम आवास योजनेअंतर्गत (Pm Awas Yojana) शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळतो. परंतु या योजनेसाठी अर्ज करताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. अर्जदाराकडून काही चुका झाल्या, तर तुमचा हा अर्ज नाकारला जातो.

पीएम आवास योजनेसाठी पात्रता | Pm Awas Yojana

  • तुम्ही जर पीएम आवास योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे स्वतःचे घर नसले पाहिजे. त्याचप्रमाणे कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीचा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कच्चा आणि तात्पुरत्या घरात राहणाऱ्या लोकांना देखील या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे.
  • कोणत्याही सदस्याकडे जर जमीन असल्यास तो घर बांधण्याच्या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत सरकारकडून अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान तुम्हाला मिळते.

पात्रता

पीएम आवास योजनेसाठी अर्ज करताना तुमची पात्रता तपासणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर या पात्रतेमध्ये समावेश नसेल, तर तुमचा अर्ज नाकारला जातो. अनुदानाची रक्कम जाहीर होण्याआधीच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सरकारकडून जाहीर केली जाते. यामध्ये सगळे काही योग्य असेल, त्यानंतर लाभार्थ्यांना योजनेची रक्कम मिळते. तुमचे नाव लाभार्थी यादी समाविष्ट नसेल, तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही.

महत्वाची कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड, जातीचा दाखला, जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी गोष्टी असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया

पीएम आवास योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जवळचा तुमच्या सेवा केंद्रात जाऊन तुम्हाला पीएम आवास योजनेचे अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करता येईल.