पंतप्रधान आवास घरकुल योजना, छे! ही तर नागरिकांची ससेहोलपट योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी सांगली | प्रथमेश गोंधळे

केंद्राने सुरु केलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा ग्रामीण भागांत बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. आता तर निवडणुकीच्या तोंडावर या योजनेला जोर आल्याची चर्चा जिल्हयात आहे. या योजनेतुन मिळत असलेल्या हक्काच्या घरासाठी नागरिकांना मैलो दूर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेमधून सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील बेघरांना घरकुल युजन सुरु करण्यात आली आहे. या घरकुल योजनेचं कार्यालय सांगलीतील महापालिकेच्या मुख्यालयात असल्याने मिरज आणि कुपवाड येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. हि बाब लक्षात घेता मिरजेचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील नागरिकांसह आयुक्त आणि घरकुल योजनेच्या समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांची भेट घेत घरकुल योजनेचं कार्यालय मिरजेत करण्याची मागणी केली, नागरिकांची होत असलेली ससेहोलपट पाहता आयुक्तांनी उद्यापासून मिरजेत कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली.

मिरज आणि कुपवाड मधील नागरिकांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सांगलीला यावे लागते. एखादा कागद प्रक्रियेसाठी राहिला तर पुन्हा मिरज आणि कुपवाडची वारी नागरिकांना करावी लागत होती. घरकुल योजेनच्या कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्यानेही मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा वेळ वाया जात होता.
तिन्ही शहरातील कार्यालय एकाच असल्याने परिणामी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असायच्या. हि बाब निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेच्या नागरिकांना घेऊन आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि योजनेच्या समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांची भेट घेतली.

नागरिकांची गैरसोय पाहता आयुक्तांनी तातडीने महापालिकेच्या मिरज कार्यालयामध्ये घरकुल योजेनच ऑफिस सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे उद्यापासून मिरजेच्या नागरिकांनी घरकुल साठी मिरज कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलं आहे.

Leave a Comment