PM Kisan 20th Installment : PM Kisan योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

PM Kisan 20th Installment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan 20th Installment । देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, शेती करत असताना त्यांना पैशाची अडचण पडू नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देण्यात येतात. २००० रुपयांच्या ३ हप्त्यातून हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजेनच्या माध्यमातून १९ हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता बळीराजा २० व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? २००० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

कधी मिळणार पीएम किसानचा २० वा हप्ता – PM Kisan 20th Installment

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा १९ वा हप्ता शेवटचा जारी केला होता, आणि तेव्हापासून शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, येत्या २० जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan 20th Installment) जमा होईल. मात्र हा फक्त अंदाज आहे. केंद्र सरकार कडून पीएम किसान योजनेबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

तुमचं नाव यादीत आहे का असं करा चेक –

सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in. भेट द्या
यानंतर होमपेजवरील “लाभार्थी यादी” बॉक्सवर क्लिक करा.
तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
नंतर “रिपोर्ट मिळवा” वर क्लिक करा.
सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये –

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचा २० वा हप्ता (PM Kisan 20th Installment) अडकू शकतो. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांचे बँक खाते आधार कार्डला लिंक केलं नसेल तर ते शेतकरी सुद्धा २० व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. याशिवाय अजून एक महत्वाची बाब म्हणजे सरकारने शेतकरी नोंदणी अनिवार्य केली आहे. नोंदणीशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.