PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता अशा प्रकारे तपासता येणार लाभार्थीचे स्टेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्यामागील उद्देश आहे. नुकतेच याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. कारण आत पीएम किसानचे लाभार्थ्यांना यापुढे आधार कार्डद्वारे लाभार्थीची स्थिती (Beneficiary Status ) तपासता येणार नाही. सरकारने यामध्ये एक बदल केला आहे. आता यापुढे लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर वापरावा लागेल.

PM Kisan 12th installment could be released on September 1 to beneficiary accounts, check latest update here | Personal Finance News | Zee News

हे लक्षात घ्या कि, नुकतेच 12 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा 12वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आला होता. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलीच नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपली सर्व कागदपत्रे बरोबर आहेत असे वाटत आहे. ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत हप्ता येण्याची वाट पाहू शकतात. तसेच, ज्यांना शंका आहे ते ते लाभार्थी आहेत की नाही हे शोधू शकतात. PM Kisan

अशा प्रकारे तपासा बेनिफिशियिरी स्टेट्स

सर्वांत आधी pmkisan.gov.in वर जा.
तेथे फार्मर्स कॉर्नरवर जाऊन बेनिफिशियिरी टॅबवर क्लिक करा.
नवीन पेजवर रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा.
त्यानंतर कॅप्चा कोड बरोबर भरा.
आता सबमिट वर क्लिक करा.
यानंतर बेनिफिशियिरी स्टेट्स दिसेल.

pmkisan.gov.in Status, Beneficiary List, Installment - www.digitalindiagov.in

‘या’ लोकांना PM Kisan चा लाभ मिळणार नाही

कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती किंवा मोठे मूल टॅक्स भरत असल्यास.
वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर शेत असलेल्यांना.
शेतजमिनीचा वापर शेतीव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जात असल्यास.
शेती करत असाल पण शेतीचे मालक नसल्यास.
सरकारी कर्मचारी किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले असल्यास.
आजी किंवा माजी खासदार, आमदार आणि मंत्री असल्यास.
प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजीनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असल्यास.
एका महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असल्यास.

PM Kisan: All about PM Kisan Status and PM Kisan Samman Nidhi

PM Kisan सन्मान निधी विषयी जाणून घ्या

1 डिसेंबर 2018 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये 4.9 एकर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एका वर्षात 3 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिली जाते. नुकतेच 17 ऑक्टोबर रोजी पीएम किसानचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला. पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. PM Kisan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा