PM Kisan FPO Yojana : खते, बियाणे अन् कृषी उपकरणांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनांमागील मुख्य उद्देश आहे. या योजनांचा लाभ सर्व स्तरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे.

PM Kisan FPO Scheme : किसान FPO योजना के लिए ऐसे करें ऑनलाइन

प्रतिकूल हवामान, कमी उत्पादन ते खर्चाचे गुणोत्तर, पीक बाजारपेठेत नेणे, खते-बियाणे निवडीपर्यंतच्या आव्हानांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने PM Kisan FPO Yojana सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकारने 2023-24 पर्यंत शेतकऱ्यांचे 10,000 गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

PM Kisan FPO Yojana विषयी जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून PM Kisan FPO Yojana द्वारे देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये दिले जात आहेत. मात्र याचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधांची खरेदी करणे सोपे होणार आहे.

Big news on PM Kisan scheme big decision of government do not give wrong information dsmp | PM Kisan Yojana: पीएम किसान योजना पर बड़ी खबर, अब 1 जनवरी को किसानों के

फक्त PM Kisan योजनेचे लाभार्थीच पात्र ठरतील

या योजनेअंतर्गत PM Kisan FPO Yojana शी आधीच जोडल्या गेलेल्या शेतकरी उत्पादक संघटनेलाच 15 लाख रुपये दिले जातील. म्हणजेच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. मात्र या योजनेशी संबंधित नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.

PM Kisan FPO Yojana: किसानों को बिजनेस शुरू करने के लिए सरकार देती है 15 लाख की रकम, ऐसे करें अप्लाई | PM Kisan FPO Yojana 2021 How to Apply Online Apply

अशा प्रकारे घेता येईल PM Kisan FPO Yojana चा लाभ

PM Kisan FPO या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला सर्वांत आधी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल. या होम पेजवरील FPO च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशनसाठी एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेले तपशील भरावे लागतील. यानंतर पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करून अपलोड करावे लागतील.यानंतर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!