Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडले जाईल. हा ‘एक्स्प्रेस वे देशाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनून विकासासह विदर्भाचा चेहरामोहरा बदलेल असेही फडणवीस यांनी सांगितले. नागपूर ते उमरेड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 353-डीच्या चौपदरीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Shinde-Fadnavis dream project Samruddhi Mahamarg to be inaugurated on Independence Day | Deccan Herald

फडणवीस म्हणाले, हा 701 किमी लांबीचा समृद्धी द्रुतगती मार्ग राज्यातील 10 जिल्हे (नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे), 26 तालुके आणि 392 गावांना जोडेल. हा एक्स्प्रेसवे पूर्णपणे सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या 8 तासांत होईल. आम्ही राज्यामध्ये रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जो विकासासाठी एक अँकर म्हणून काम करेल.

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार आहे. याच बरोबर नागपूर ते गोव्यासाठी देखील असाच आणखी एक द्रुतगती मार्ग प्रस्तावित आहे जो मराठवाडा, सोलापूर आणि कोल्हापूरमधून जाईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. Samruddhi Mahamarg

Maharashtra government requests Defence Ministry to declare Mumbai-Nagpur Samruddhi Expressway as Defence industry corridor - CityKatta

फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प-

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा 2014 च्या तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. 2015 मध्ये फडणवीस सरकारकडून पहिल्यांदा समृद्धी महामार्ग ग्रीनफिल्ड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर जुलै 2017 मध्ये यासाठीच्या भूसंपादनाला सुरुवात झाली. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची पायाभरणी केली, त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. या प्रकल्पाचे नेतृत्व राज्य पायाभूत सुविधा विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) करत आहे.

या प्रकल्पासाठी, MSRDC कडून जवळपास 28,000 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. या 701 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचे काम 16 पॅकेजमध्ये विभागण्यात आले होते. ज्याचे काम Afcons इन्फ्रास्ट्रक्चर, लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसहीत एकूण 13 कंत्राटदारांना देण्यात आले होते. या एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी एकूण किंमत 55,332 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Road Development Corp Puts Brakes On Samruddhi Use | Aurangabad News - Times of India

MSRDC ची एक्स्प्रेस वेच्या बाजूने 19 नवीन शहरे विकसित करण्याची देखील योजना आहे, त्यापैकी आठ शहरांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आठ नवीन शहरांपैकी सहा शहरांचे भूसंपादन पुढील वर्षी जूनपर्यंत पूर्ण होईल. तसेच कृषी समृद्धी नगरच्या पुढाकाराने विकसित केलेली प्रत्येक टाउनशिप अंदाजे 1000-1500 हेक्टर क्षेत्रफळात बांधली जाण्याची कल्पना पुढे आली आहे. Samruddhi Mahamarg

महाराष्ट्र सरकारने या समृद्धी एक्स्प्रेस वेवरून जाणाऱ्या वाहनांसाठी जास्तीची वेग मर्यादा देखील अधिसूचित केली आहे. या एक्स्प्रेस वेवर ताशी 100 ते 120 किमी वेगाने वाहने जाऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे. त्यांनी वाहनाच्या प्रकारानुसार वेग मर्यादा देखील दिल्या आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, या महामार्गावर दुचाकी, ऑटो रिक्षा आणि क्वाड्रिसायकलला परवानगी दिली जाणार नाही. Samruddhi Mahamarg

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ, आजचे नवीन दर पहा
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी
खुनाचा गुन्हा चालेल पण विनयभंगाचा नाही; जितेंद्र आव्हाड भावुक
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे पुन्हा संतापले; म्हणाले, काम करायचं नसेल तर…
बाबा रामदेवांना धक्का : पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी