PM Kisan: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २० वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, याआधीच सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांना यंदाचा हप्ता मिळणार नाही. यासाठी 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान विशेष सॅच्युरेशन ड्राइव्ह राबवण्यात येत आहे.
कोणत्या 3 गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे? (PM Kisan)
ई-केवायसी (e-KYC)
बँक खातं व आधार लिंक
जमीनची पडताळणी (Land Verification)
या तिन्ही बाबींची पूर्तता केली असल्यासच शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच 2000 रुपयांची थेट मदत विनाअडथळा मिळू शकेल.
20 वा हप्ता जूनमध्ये अपेक्षित (PM Kisan)
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. सहसा दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी असतो. त्यामुळे पुढील – 20 वा हप्ता जून 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आजपर्यंत 19 हप्त्यांमध्ये 38,000 रुपये वितरित केले आहेत. योजना सुरू झाल्यापासून लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. आता 20 वा हप्ता मिळवण्यासाठी पात्रतेची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
31 मे ही अंतिम मुदत
शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क करून, वरील आवश्यक बाबींची पूर्तता तत्काळ करावी. 31 मेनंतर यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा अपात्रता टाळण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध असणार नाही.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
जर आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्याला 20 वा हप्ता वेळेवर हवा असेल, तर खालील तीन प्रश्न स्वतःला विचारा
- माझं e-KYC अपडेट आहे का?
- बँक खातं आधारशी लिंक आहे का?
- माझ्या नावावरची जमीन पडताळलेली आहे का?
जर उत्तर “होय” असेल तर आपण निर्धास्त राहू शकता. अन्यथा, 31 मेपूर्वी ही कामं पूर्ण करा. तुमच्या गावातील कृषी सहायक किंवा ग्रामपंचायतीकडूनही याबाबत अधिक माहिती मिळवता येऊ शकते.