PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम यवतमाळमध्ये झालेला आहे. परंतु देशातील असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांच्या खात्यात 16 वा हप्ता झालेला नाही परंतु हा हप्ता शेतकऱ्यांना का मिळाला नाही त्याची नक्की काय कारण आहेत हे आपण पाहूया.
पंतप्रधान मोदी यांनी 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये हस्तांतरित केलेले आहे. मागील अनेक दिवसापासून देशातील करोडो शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी सरकारकडून सांगण्यात आले होते की, पी एम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला जारी केला जाईल. परंतु अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न आलेले आहे.
हप्ता न मिळण्याचे कारण | PM Kisan Samman Nidhi Yojana
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळालेला नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 16 वा हप्ता नक्कीच येईल. परंतु जर तुमचा हप्ता आला नसेल तर याची 3 मोठी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे तुम्ही केवायसी पूर्ण केले नसेल. त्याचप्रमाणे तुम्ही जिओ व्हेरिफिकेशन केलेले नसेल किंवा तुमच्या आधार लिंक नसेल या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता मिळालेला नसेल.
परंतु तुम्ही तुमची ही काम पूर्ण केली तर तुमच्या खात्यात 16 (PM Kisan Samman Nidhi Yojana) हप्ता नक्की येईल. त्यामुळे ज्यांच्या हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांनी चिंतेत राहण्याचे काही कारण नाही. तुम्ही सरकारच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून सविस्तर माहिती मिळू शकता. तसेच तुमचा हप्ता का रखडला आहे याची माहिती देखील तुम्ही घेऊ शकता.