PM Kisan Samman Nidhi | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहे. ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत असतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत देत असते. हे 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा होत असतात. प्रत्येक हप्ता अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 2 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते जमा झालेले आहेत. आता 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? याची सगळेजण प्रतीक्षा करत आहेत.
भारत सरकारने अलीकडेच पीएम किसान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचा 16 वा हप्ता पाठवला होता. मात्र, हा हप्ता देऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी शेतकरी आता 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता सरकार कधी जारी करू शकते हे जाणून घेऊया.
ई-केवायसी करणे आवश्यक | PM Kisan Samman Nidhi
केंद्र सरकार जून किंवा जुलै महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी करू शकते. आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्यासाठी पैसे जारी करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेअंतर्गत जमीन अभिलेख पडताळणी आणि ई-केवायसी केलेले नाही. त्यांना पुढील 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे, लाभ मिळविण्यासाठी, तुम्ही तुमचे केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर या योजनेत सादर करणे महत्त्वाचे आहे.