PM Kisan Samman Nidhi Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो शेतकऱ्यांना लाभ होत असतो. अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकारची ही एक नवीन योजना आहे. नुकताच या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. परंतु देशभरात सुमारे 40 लाख शेतकरी असे शेतीकरी आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही 16 वा हप्ता जमा झालेला नाही. सरकारने नुकतेच 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना ही 2019 मध्ये सुरू केली होती. शेतकऱ्यांचे आर्थिक कल्याण लक्षात घेऊन तसेच त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली होती. नुकतेच या योजनेचा 16 वा (PM Kisan Samman Nidhi Yojana)हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. परंतु 40 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. परंतु तो का मिळालेला नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे? जर तुम्ही तुमच्या बँकेचे केवायसी केले नसेल त्याचप्रमाणे आधार लिंकिंग केले नसेल तरी देखील तुमच्या खात्यात हा आता आलेला नसेल.
या गोष्टी करणे गरजेचे | PM Kisan Samman Nidhi Yojana
सरकारने हा हप्ता येण्यासाठी दुसरा पर्याय दिला होता जो काही मिनिटातच करता येतो. ते म्हणजे सरकार शेतकऱ्यांना ईकेवायसी करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या आधार कार्ड बँकेशी लिंक करायचे आहे ज्यांच्या आधार कार्ड हे बँकेचे लिंक नसेल त्यांच्या खात्यात हप्ता आलेला नाही.
ही कामे तुम्ही अगदी घरबसल्या देखील करू शकता . सगळ्यात आधी तुम्हाला फोनवर पीएम किसान ॲप डाऊनलोड करायचा आहेn त्यानंतर इकेवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. तसेच तुम्ही कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन देखील इकेवायसी करू शकता. त्याचप्रमाणे आधार अपडेट देखील करू शकता. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 16 वा हप्ता नक्कीच जमा होईल.