PM Kisan Sanman Nidhi Yojana | PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना योग्य प्रमाणात शेती करता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यात सरकारकडून पंतप्रधान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ही योजना चालवली जाते. ही योजना खूप लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. चार महिन्यांच्या अंतरांनी तीन समान हफ्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते. परंतु आता या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान संबंधी योजनेच्या नावाखाली एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये. असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.

ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फायबर फसवणूक केली जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर त्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण मोबाईल आणि सिम कार्ड देखील हॅक होते. समोरील व्यक्ती मोबाईल्स आणि सिम कार्डचा ताबा घेतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसू शकतो.

सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांबाबत देखील घडायला लागलेले आहेत. अशा प्रकारची कोणतीही फसवणूक जर शेतकऱ्यांची झाली असेल, तर त्यांनी 9330 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही थेट गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही या योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता.