PM Kisan Scheme: पंतप्रधान किसानच्या पुढील हप्त्यासाठी त्वरित जमा करा ‘ही’ कागदपत्रे, अन्यथा पैसा जमा होणार नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीत सरकार काही बदल करणार आहे. आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ आता फक्त अशा शेतकऱ्यांनाच देण्यात येईल ज्यांच्या नावे शेतजमिनी असतील म्हणजेच पूर्वीप्रमाणे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत भागभांडवल होते त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आपल्या नावावरही शेती असेल तर हे काम त्वरित करा, अन्यथा आपला पुढचा हप्ता अडकला जाईल.

दरवर्षी पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 2000, 2000 रुपये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो.

ही माहिती द्यावी लागेल
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पूर्वी काही चुका आढळल्या, ज्या सुधारण्याचे सरकारने ठरविले आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना आता अर्जात त्यांचा भूखंड क्रमांक नमूद करावा लागेल. तथापि या नवीन नियमांचा योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थींवर परिणाम होणार नाही.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. आपण घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याशिवाय या योजनेसाठी आपण पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा कॉमन सर्विस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त आपण या योजनेसाठी स्वतः नोंदणी देखील करू शकता.

आपण अशा प्रकारे नोंदणी करू शकता
>> तुम्हाला पहिले PM Kisan च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्ही ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर आधार क्रमांक एंटर करावा लागेल.
>> यासह, कॅप्चा कोड एंटर करुन राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> तसेच बँक खात्याचा तपशील आणि शेतमालाशी संबंधित माहिती भरावी लागेल.
>> यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment