PM Kisan Yojana 20th Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा; तुम्हाला पैसे मिळाले का इथे चेक करा

PM Kisan Yojana 20th Installment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana 20th Installment । पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यावेळी डीबीटी द्वारे २००० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तब्बल ९.७० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. खरं तर मागील महिण्यापासूनच हे पैसे कधी एकदा मिळतायत याकडे देशभरातील बळीराजा डोळे लावून बसला होता. अखेर आज २००० रुपये शेतकऱ्याला मिळाले आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत सरकारने ट्विट करत म्हंटल कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सक्षम शेतकऱ्यांच्या, समृद्ध राष्ट्राच्या दिशेने आणखी एक पाऊल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एका क्लिकवर, देशातील ९.७० कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे २०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमान आणि समृद्धीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं सरकारने म्हंटल आहे. PM Kisan Yojana 20th Installment

तुम्हाला पैसे मिळाले का इथे चेक करा– PM Kisan Yojana 20th Installment

तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये जमा झाले का हे तुम्ही विविध पद्धतीने चेक करू शकता. तुम्हाला सर्वात आधी याबाबत तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. परंतु मोबाईल मेसेज आला नाही तर तुम्ही स्वतः स्टेटस तपासू शकता. त्यासाठी

१) सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
२) यंत्र Status of Self Registered Farmer वर क्लिक करा
३) आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
४) तुमच्या अर्जाची नवीनतम माहिती तुमच्यासमोर उघडेल.

कोणासाठी आहे हि योजना –

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. २००० रुपयांच्या ३ हप्त्यातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हाच या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.