हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ज्यामुळे देशभरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. खरं तर आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून १९ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता २० वा हप्ता कधी येणार याकडे देशातील बळीराजा डोळे लावून बसला असतानाच केंद्र सरकारने याबाबत घोषणा करत शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २ ऑगस्ट रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे २ ऑगस्टला शेतकऱ्यांना २००० रुपयांची भेट मिळणार आहे.
कृषी विभागाने याबाबत ट्विट करत म्हंटल कि, आता वाट पाहण्याची गरज नाही! पीएम-किसानचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून थेट तुमच्या खात्यात पोहोचेल. जर मेसेजची रिंग वाजली तर समजून घ्या की किसान सन्मानाची (PM Kisan Yojana) रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर असतील आणि या काळात ते उत्तर प्रदेशला १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देतील. याच कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan Yojana) वितरित करणार आहेत.
अब और इंतजार नहीं!
— Agriculture INDIA (@AgriGoI) July 29, 2025
PM-Kisan की 20वीं किश्त 2 अगस्त, 2025 को वाराणसी, उत्तर प्रदेश से सीधे आपके खाते में पहुंचेगी।
मैसेज टोन बजे तो समझिए आपके खाते में किसान सम्मान की धनराशि पहुंच गई है।#AgriGoI #Agriculture #PMKisan #PMKisan20thInstallment @PMOIndia @narendramodi… pic.twitter.com/pgqTLOWNPM
काय आहे पीएम किसान योजना – PM Kisan Yojana
पंतप्रधान किसान सन्मान योजना हि २०१९ मध्ये केंद्र सरकारने सुरु केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून हि योजना (PM Kisan Yojana) चालवली जाते. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यो योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६००० रुपये बळीराजाच्या बँक खात्यात सरकार कडून जमा केले जातात. २००० रुपयांच्या ३ हप्त्याच्या रूपात हे पैसे थेट शेतकऱ्याला दिले जातात. आत्तापर्यन्त १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले होते. त्यानंतर ४ महिने उलटूनही पीएम किसान योजनेचं पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र आता सरकारने २ ऑगस्टला हे पैसे शेतकऱ्यांना देणार असल्याचं जाहीर केल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.




