कोरोना संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली व्यक्त करतो असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार केला गेला.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, ”२१ वं शतक भारताचं आहे असं आपण म्हणत होतो त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना स्वतःच्या हिमतीने करण्याचा विचार आपण केला होता. त्यामुळे आज येणारी प्रत्येक समस्या ही संधी म्हणून पाहायला हवी असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला. याबाबतचं उदाहरण देताना पीपीई किट आणि N95 मास्कसाठी संपूर्ण परावलंबी असणारा भारत, कोरोना संकटानंतर स्वयंपूर्ण झाल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आज जगभरात आत्मनिर्भरतेचे संदर्भ बदलले असून अर्थकेंद्री जग विरुद्ध मानवतेचं जग हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहिला आहे असं मोदी म्हणाले.

भारताने नेहमीच वसुधैव कुटुंब या भूमिकेला पूरक काम करत राहिला असून भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये सर्वांची काळजी, शांती आणि सामंजस्याची भूमिका जाणवते असं नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. सुखी, समृद्ध विश्वासाठी भारताची आत्मनिर्भरता दिशादायक ठरेल असंही मोदी पुढे बोलताना म्हणाले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment