चेंबूरमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तर काही ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारतींचा भागही कोसळून नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना व जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मदत जाहीर केली आहेत.

मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येथील दुर्घटनेतील लोकांना मदतही जाहीर केली आहे.

दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ कडून प्रत्येकी लाख रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तींना पन्नास हजार रुपये, अशी मदत पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे. चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment