पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा ढाळले अश्रू; आता ‘या’ कारणाने झाले भावूक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आज राज्यसभेत भाषण केलं. आज काही खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत असले तरी तुमच्यासाठी माझे दरवाजे नेहमी खुले आहेत, असं मोदी म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या जम्मू काश्मीरमधील राज्यसभा खासदारांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे बडे नेते खासदार गुलाम नबी आझाद यांचा 15 फेब्रुवारीला राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गुलाम नबी आझाद यांनी खासदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून दर्जेदार काम केलं. त्यांचं काम नव्या खासदारांसाठी प्रेरणा देणारं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

”गुलाम नबी आझाद ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यामध्ये जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये 8 लोक मारले गेले. त्यावेळी पहिल्यांदा गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तेव्हा ते अश्रू रोखू शकले नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरू शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केले,” असं सांगताना मोदी भावूक झाले होते.

 

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like