आव्हानांचा सामना करा, टीम वर्क शिका… मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

0
6
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले . या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच मोदी यांनी आपल्या बालपणातील काही आठवणींवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी आहार, जीवनशैली, पर्यावरण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार मांडले. विद्यार्थ्यांचे प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी त्यांना चांगले सल्ले दिले आणि परीक्षा ताणावर कसे नियंत्रण ठेवायचे यावर चर्चा केली.

नरेंद्र मोदी यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन –

जेवण कधी आणि किती वेळा खायचं याबद्दल सांगितले, तसेच जेवण 32 वेळा चावून खाण्याचा सल्ला दिला.
जंक फूडवर निर्बंध ठेवून घरच्या पचनक्षम आहाराचे महत्त्व सांगितले.
पाणी कसे प्यावे, त्याचे महत्व आणि त्याचा स्वाद समजून घेतल्याची सूचना केली.
विद्यार्थ्यांना “मिलेट्स” (सिर्फ अन्नधान्य) खाण्याचा सल्ला दिला.
योग्य वेळी झोपेचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रत्येकाने एक समान दिनचर्या ठेवण्याचा सल्ला दिला.
सूर्य स्नानाची आवश्यकता सांगितली आणि त्याचे फायदे काय होतात याची संपूर्ण माहिती दिली .
परीक्षा ताणावर कसा मात करायचा याबद्दल अनेक टिप्स दिल्या, जेणेकरून विद्यार्थी फक्त परिश्रमावर लक्ष केंद्रित करू शकतील.

अभ्यासासोबतच नेतृत्व गुणांची महत्त्वाची शिकवण –

कार्यक्रमासाठी 3.30 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि 20.71 पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली . यातील निवडक 2500 जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रम दरम्यान पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच नेतृत्व गुणांची महत्त्वाची शिकवण दिली. त्यांनी सांगितले की, लीडरला टीम वर्क शिकणं आवश्यक आहे आणि कुणालाही काम देताना त्याच्या अडचणी समजून घ्याव्यात. “जिथे कमी, तिथे आम्ही” हा सिद्धांत कायम ठेवावा. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा दिली आणि सांगितले की, जर तुम्हाला मागील वेळी 30 मार्क्स मिळाले असतील, तर यावेळी 35 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. हे एक तुमच्यासाठी मोठं आव्हान असेल , पण तुम्ही ते पार कराल , असा माझा विश्वास आहे असे पंतप्रधान म्हणाले.

पालकांसाठी महत्वाचे सल्ले –

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट, लिखाणाची महत्त्व, टिंकरिंग लॅब्स व मेडिटेशन यासारख्या विषयांवर विचारले आणि त्यांच्या पालकांसाठी काही महत्वाचे सल्ले दिले. त्यांच्या या टिप्स विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत.