मोदींच्या हस्ते झाले पुण्यातील भुयारी मेट्रोचे लोकार्पण; जाणून घ्या तिकिटाचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भुयारी मेट्रो मार्गाचे काम चालू झालेले आहे. आणि अशाच आता पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू झालेला आहे. स्वारगेटचा ट्रो मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील पुण्यात उपस्थित राहणार आहे. या मेट्रो मधून सगळ्यात आधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित नेते महिला तसेच लहान मुले प्रवास करणार आहे. आणि आज दुपारी 4 वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झालेले आहे. त्यामुळे आता दुपारी चार वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा भुयारी मार्ग जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा असणार आहे. पुण्यातील हा पहिला भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय कसबा पेठ मंडई स्वारगेट ही चार मेट्रो स्थानके आहेत. आता या मार्गावरील तिकिटाचे दर कसे असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

तिकिटाचे दर कसे असणार ?

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 10 रुपये एवढे तिकीट असणार आहेत. जिल्हा न्यायालयाचे मंडळी पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे. स्वारगेट ते मंडईपर्यंत तुम्हाला 10 रुपये तिकीट लागणार आहे. त्याचप्रमाणे स्वारगेट ते कसबा पेठपर्यंत 15 रुपये तिकीट असणार आहे. आणि स्वारगेट ते जिल्हा न्यायालय पर्यंत तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे.

या आधी नरेंद्र मोदींचा पुण्यात पुण्यामध्ये 26 सप्टेंबर रोजी दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु पुण्यामध्ये तसे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला.आणि नरेंद्र मोदींचा हार दौरा रद्द करण्यात आला होता. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवून या मेट्रोचे लोकार्पण केलेले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील स्वतः उपस्थित होते.