ठरलं! राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्याचं हस्ते होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाला आगस्ट महिन्यातील २ तारखा पाठवल्या होत्या.मात्र, या दोन्ही तारखांबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अजून उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असल्याचे निश्चित झालं असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. ते आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भानही यादरम्यान ठेवण्यात येईल. या कार्यक्रमात १५० निमंत्रितांसह एकूण २०० पेक्षा अधिक जण सहभागी होणार नाहीत, अशी माहितीही स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे,” असंही स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले.

राम मंदिर १६१ फूट उंच
राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे १६१ फूट असणार आहे. हे मंदिर २ मजली असेल. या २ मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्याप्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर १६१ फूटांचं मंदिराचं बांधकाम होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेते दिवंगत अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात २० फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे,” असंही यावेळी गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment