व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचा आज 100 वा वाढदिवस… यानिमित्ताने मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. मोदींनी हिराबेन यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. म

मोदींनी ट्विट केलेल्या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे की, त्यांनी आपल्या मातोश्रीचे चरण धुतले आहेत. तर दुसऱ्या फोटो मध्ये ते आपल्या आईची आस्थेने विचारपूस करताना दिसत आहेत…. तर तिसऱ्या फोटो मध्ये मोदींच्या आई हिराबेन प्रेमाने आपल्या मुलाला मिठाई भरवत आहेत. मोदींचे हे फोटो खूपच कमी वेळात व्हायरल झाले.

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हिराबेन यांची त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट घेतली होती. त्यानंतर आज मोदींनी आपल्या आईची भेट घेत आशीर्वाद घेतले.