मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणपतीची आरती; राजकीय चर्चाना उधाण

0
1
Narendra Modi CJI DY Chandrachud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि गणपती बाप्प्पाच्या आरतीत सहभाग घेतला. यावेळी चंद्रचूड यांच्या घरी त्यांची पत्नी कल्पना दास यांनी मोदींचे स्वागत केलं. समारंभात पंतप्रधानांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन टोपी परिधान केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी गणपती पूजनात सहभागी होताना दिसत आहेत.

अतिशय पारंपारीक मराठी लूक मध्ये मोदी दिसत आहेत. सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो. भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो असं मराठी भाषेतून मोदींनी ट्विट केलं. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुनावणी आज होणार आहे. त्यापूर्वीच मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वातावरण सुद्धा गरम झाल आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका सुद्धा केली आहे.

प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेशोत्सवाला गेले मला माहित नाही, पण काल ते सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या घरी गेले आणि धर्मनिरपेक्ष अशा या देशात आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं. खरं म्हणजे हे संविधानाला आणि प्रोटोकॉल ला धरून आहे का याबाबत घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरु आहे. आमच्या मनात प्रश्न येतोय कि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार बसलं आहे, त्याविरोधात न्याय का मिळत नाही? आम्हाला सतत तारखांवर तारखा का पडत आहेत याबद्दल आमच्या मनात शंका आहे. हे का होतंय? सरन्यायाधीश चंद्रचूड पदावरून असताना सुद्धा ३ वर्षांनी निर्णय आणि निकाल होत नाही आणि आता तर थेट पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी पोचले. मग वेगळं काहीतरी घडतंय का? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखी महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का? या शंका घट्ट झाल्या असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला.