मोदींच्या हाती कोल्हापूरचे डिझाईन; विकास डीगेची क्रिएटिव्हिटी झळकली देशभर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर या शहराला कलेचे माहेरघर म्हणतात. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अश्याच एक कोल्हापूरच्या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली. जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रियेटीव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने कोरोना विषाणूचे चित्र वापरून कोईभी रोडपे ना आये. असे सूचक आणि प्रभावी डिजाईन बनवले होते.

जनता कर्फ्यु च्या आदल्या दिवशी ता 22 रोजी त्याने हे त्याच्या फेसबुक वरून शेअर केले होते. या इतक्या प्रभावी क्रियेटीव्हीटीच्या भुरळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पडली. त्यांनी देशाला संबोधित करताना विकास याची क्रिएटिव्हिटी संपूर्ण देशाला दाखवली. त्यात त्यांनी समाज माध्यमातून अश्या प्रकारे जागृती करणाऱ्यांचा विशेष उल्लेख करत त्यांचे आभार देखील मानले. विकास डिगे याची लक्ष्मीपुरी परिसरामध्ये ऍड टूमारो ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे.

या छोट्याश्या क्रिएटिव्ह ची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान घेतील अशे स्वप्नात देखील वाटले न्हवते. मात्र 21 तारखेला हे क्रिटिव्ह पोस्ट केल्या नंतर अनेकांनी हे क्रिटिव्ह शेअर केले तसेच स्वतः डीपी देखील लावले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे समाधान वाटले. मात्र खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या हाती माझे क्रिटिव्ह बघून सर्व स्वप्नवत वाटलं.अशी प्रतिक्रिया विकास डीगे यांनी व्यक्त केलीय.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment