पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भातील ‘ते’ ट्विट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले.

भारतानं रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार 500 BTC खरेदी करुन लोकांना वाटत आहे’ असं हॅकर्सनी ट्विट केलं. पण हॅकर्सचा हा गोंधळ फार काळ चालला नाही. दोन मिनिटानंतर हे ट्विट डिलिट केलं गेलं. नंतर पुन्हा 2 वाजून 14 मिनिटांनी पुन्हा ट्विट केलं गेलं. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता बिटक्वाईन्सला मान्यता देणार. त्यानंतर पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलिट केलं गेलं. पण तोपर्यंत लोकांनी त्याचे स्क्रिनशॉट घेऊन व्हायरल केले. परंतु पंतप्रधानांचं ट्विटर हँडल सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय असा सवाल निर्माण झालाय.

पंतप्रधानांचं अकाऊंटच हॅक झाल्याने सायबर सेक्युरिटीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. अकाऊंट हॅक करण्यामागे कोण व्यक्ती किंवा संघटना आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटशी संलग्न ट्वीटर अकाऊंट आणि मोबाईल अप हॅक अज्ञात गटाने करण्यात आलं होतं.

Leave a Comment