पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले बेंजामिन नेत्यानाहू यांचे अभिनंदन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज फोनवर संभाषण झाले. नेत्यानाहू यांनी मागच्याच महिन्यात इस्रायल मध्ये त्यांचे सरकार स्थापन केले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच विक्रमी ५ व्या वेळेस हे पदग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या या साथीत तसेच इतर क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याविषयी चर्चा केली तसेच कोरोना विषाणूनंतर भारत आणि इस्रायल यांचे परस्पर संबंध यावर चर्चा केली तसेच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, अशी माहिती मिळाली आहे. तसेच मोदींनी नेत्यानाहू यांना ही परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भारत भेटीला येण्याचेही निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

याअगोदर या दोन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दोनदा सल्लामसलत केली होती. नेत्यानाहू यांच्या विनंतीवरून भारताने इस्रायल ला हॅड्रॉक्सिक्लोरीन आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरविली होती. मोदींनी देखील नेत्यानाहू यांच्याशी उत्कृष्ट संवाद झाला असल्याचे ट्विट केले आहे. एकाच वर्षात सलग तीन निवडणुकांमध्ये स्पष्ट जनादेशासाठी संघर्ष करून शेवटी १७ मे रोजी त्यांनी सरकार स्थापन केले आहे.

Leave a Comment