पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी व अमित शहा यांची तानाजींशी तुलना करणारा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाजी महाराजांचे वंशज भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

तान्हाजी चित्रपटातील काही प्रसंगाचं मॉर्फिंग करत दिल्ली निवडणुकांमध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न बीजेपीच्या आयटीसेलकडून करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिकेला पोहचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मार्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर तोफ डागल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. संबंधित पक्षानं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसंच, केंद्र सरकारनं चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी केली आहे. ‘आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या भावनांची कदर करून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करू नये,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

याआधी भाजपचे दिल्लीतील एक नेते जयभगवान गोयल यांनी मोदींची शिवरायांशी तुलना करणारे पुस्तकच प्रकाशित केले होते. त्यावरून उठलेलं वादळ शमत नाही तोच हा व्हिडिओ आल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप आहे.या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सायबर सेलला टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमींकडून ट्विटरवर करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News’

हे पण वाचा-

कितीही विरोध करा, CAA परत घेतला जाणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

चले जाओ, हा हिंदूस्तान आहे पाकिस्तान-बांगलादेश नाही; मनसेची पुण्यात पोस्टरबाजी

Leave a Comment