मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्राला पत्र; मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे.

हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी स्वतंत्र अ‍ॅपच्या वापराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी तीन दिवसांत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 53 लाख लसींचा साठा मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment