भाषण करताना टेलिप्रॉम्टर बंद पडला अन् मोदींचा गोंधळ उडाला ; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भाषणबाजीमुळे जगप्रसिद्ध असलेले आणि लोकांना मंत्रमुग्ध करणारी व्यक्ती म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. त्यांच्याबाबतीत आज भाषण करताना त्यांचा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणा दरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाडानंतर पंतप्रधान मोदी काहीशे गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी संतापही व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. यावेळी त्यांनी आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह कोरोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे असे सांगत असताना अचानक टेलिप्रॉम्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले.

या घडलेल्या प्रकारानंतर मोदी यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारले. या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आले नसल्याची टीका सोशल मीडियावरुन मोदी यांच्यावर होऊ लागली आहे.