मोदींचं उद्या देशाला संबोधन; काय बोलणार या चिंतेने जनतेच्या पोटात गोळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारही लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्या मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्र सरकारकडून या लॉकडाऊनमध्ये काही सवलती दिल्या जातात का हे पाहणंही यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (११ एप्रिल रोजी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

शनिवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मोदी देशातील जनतेला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ‘मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार नाहीत,’ अशी माहिती भारत सरकारनेच जारी केली होती. त्यामुळेच त्या बैठकीनंतर दोन दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या लॉकडाउन संदर्भातील महत्वाच्या निर्णयांची घोषणा पंतप्रधान करतील असं सांगितलं जात आहे. पण राज्यांचं लॉकडाऊन असतानाही केंद्राच्या लॉकडाऊनची काय गरज? असाही प्रश्न निर्माण होतो आहे.

घटनेनुसार, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे राज्य सरकार या दोन विषयांवरच निर्णय घेऊ शकतं. याशिवाय साथीचे रोग कायदा १८९७ या अंतर्गतही राज्याला बरेच अधिकार आहेत. या अंतर्गतच राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोणत्याही आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना या कायद्यामुळे मिळतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment