उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो; पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव
ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अस मोदींनी म्हंटल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना. अस ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात भाजप- शिवसेना युती तुटली असली तरी मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंधात कधीही कटुता आली नाही.

दरम्यान, राज्यातील पूरस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

You might also like