आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्व सामान्यांची जीवनशैली वाढवण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प वैयक्तिक, गुंतवणुकदार, उद्योग व याचबरोबर पायाभूत सुविधा क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आजच्या बजेटच्या हृदयात गाव आहे. शेतकऱ्यांचा विकास आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली आहे.तसेच संधीची समानता हे सूत्र लक्षात घेऊन या बजेटमध्ये महिलांसाठी तरतूद केली आहे.असेही मोदी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like