पंतप्रधान आता क्षेपणास्त्र सज्ज विमानांतून प्रवास करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक ‘मिसाइल डिफेन्स सिस्टम’ असणार आहे. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे, तर हवाई दलाचे वैमानिक करतील. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते जुलै २०२० पासून बोईंग ७७७ या विमानातून प्रवास करतील.

देशाच्या पंतप्रधानांसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमाने असतील. या विमानांचे उड्डाण हवाई दलाचे वैमानिक करणार आहेत. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. जुलै २०२० पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या विमानांतून प्रवास करणार आहेत. अमेरिकी प्लांटमध्ये या विमानांची निर्मिती होत आहे. अमेरिकी बी ७७७ विमानात लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर मेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सुइट्स (एसपीएस) असणार आहेत. ही विमाने जुलै २०२०मध्ये भारतात आणली जाणार आहेत.

दरम्यान देशातील सर्वोच्च पदांवर असलेले नेते या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमांनांतून प्रवास करणार आहेत. पहिल्यांदाच या नेत्यांना घेऊन उड्डाण भरणाऱ्या विमानांचे सारथ्य एअर इंडियाचे वैमानिक करू शकणार नाहीत. वैमानिक बदलणार असले तरी, या विमानांची देखभाल करणारे पथक एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे (एआयईएसएल) असणार आहे. या विमानांमध्ये एअर इंडियाचे क्रू मेंबरच सेवा देतील.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment