PM Shram Yogi Mandhan Yojana | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून जनतेच्या हिताच्या अनेक योजना आणल्या जातात. त्याचा फायदा आजपर्यंत कितीतरी लाखो लोकांना झालेला आहे. अशातच आता सरकारकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. या कामगारांना दिलासा देणारी एक योजना भारत सरकारने आणलेली आहे. ज्या लोकांचे उत्पन्न अस्थिर आहे. तसेच भविष्याच्या बाबत असुरक्षितता आहे. अशांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana ) आणलेली आहे. या कामगारांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू नये. यासाठी ही योजना आणलेली आहे.
काय आहे सरकारची पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ? | PM Shram Yogi Mandhan Yojana
केंद्र सरकारने ही योजना एक 2019 साली सुरू केलेली आहे. असंघटित क्षेत्राचे लोक काम करतात, त्या मजुरांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही रक्कम गुंतवावी लागते. ज्या प्रकारे तुम्ही ही रक्कम गुंतवाल त्या प्रकारे तुम्हाला पेन्शन मिळेल. जर तुम्ही 200 रुपये दर महिना या योजनेत सलग 20 वर्ष नियमितपणे गुंतवले, तर तुमची वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेतून दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
योजनेचा अर्ज कसा करावा ?
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करावी लागेल. यासाठी तुमचे आधार कार्ड, बँक डिटेल्स द्यावे लागेल. तुमची नोंदणी झाल्यावर मोबाईलवर मेसेज येऊन तुम्हाला खाते उघडण्याची माहिती मिळेल. यानंतर प्रीमियरची रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यातून आपोआप कट केली जाईल. परंतु यातील पहिला हप्ता मात्र चेक किंवा रोख रकमेने भरावा लागतो.
योजनेचे फायदे | PM Shram Yogi Mandhan Yojana
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या भविष्याचा विचार करून ही एक आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी योजना आहे. आपण नेहमीच आजचा दिवस जगतो. परंतु भविष्यात पुढे काय वाढून ठेवलेले आहे, याची आपल्याला काहीच कल्पना नसते. त्यामुळेच भविष्याची आर्थिक सुरक्षा देखील महत्वाची आहे.याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतरच्या काळातही कामगारांना त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल. त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही.