Pune News : पुण्यातील ‘हे’ रस्ते होणार चकाचक!! महापालिकेने काढल्या 170 कोटींच्या निविदा

Pune Road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहर (Pune City) दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रस्त्यांच्या दृष्टीकोनातून मात्र पुण्याचा त्याच गतीने विकास करण्यासाठी पुणे महानगर  पालिका पाऊले टाकताना दिसत आहेत. ह्यासोबतच पुण्यात पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत 23 गावांचा समावेश  करण्यात आला. त्या भागात रस्त्यांचा विकास मात्र झालेला नाही.  हे लक्षात घेत पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) 170 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.

पुणे शहराच्या हडपसर व मुंढवा भागात रस्ते विकासच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक व खाजगी भागीदारीतुन (PPP) तत्वाच्या धोरणावर आधारित रस्ते विकास केला जाणार आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेकडून विकासकाला क्रेडिट नोट दिली जाणार आहे.  क्रेडिट नोटच्या आधारभूत विकासक हडपसर आणि मुंढवा भागातील महमंदवाडी येथील विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या एकूण चार रस्त्यांच्या विकासाचे काम करण्यात येणार आहे. पुणे शहराची वाढती हद्द लक्षात घेता त्यादृष्टीने निधी मात्र उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून क्रेडिट नोटचा पर्याय पुढे आणला आहे. महापालिकेने पुण्याच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी नवीन विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नवीन  रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. तसेच त्याचे मार्किंग देखील पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका क्रेडिट नोटच्या माध्यमातून मुंढवा-खराडी नदीवरील पूल, गंगाधाम चौकातील उड्डाणपूल, समतल विलगक (ग्रेड सेप्रेटर) बरोबरच मुंढवा, बाणेर, बालेवाडी आणि महंमदवाडी येथील रस्त्यांचे  काम पुर्ण करणार  आहे. त्याचबरोबरीने  महंमदवाडी येथील सर्वेक्षण क्रमांक १, २, ३ आणि ४ तसेच ९६,५९, ५८, ५७ मधील २४ मीटर रुंदीच्या रस्ता,रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील सर्वेक्षण क्रमांक ४० ते ७६ येथील ३० मीटर रुंदीचा आणि लगतचे १८ मीटर रुंदीचे रस्ते,सर्वेक्षण क्रमांक १२, १२, ३० आणि ३२ मधून जाणाऱ्या अनुक्रमे १८ आणि २४ मीटर रुंदीच्या रस्ते विकसित  केले जाणार आहेत.