पीएमसी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रिझर्व्ह बँकेला दोष देऊ नका – उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । ‘पीएमसी’ बँकेचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर देशामध्ये मोठी खळबळ उडाली होती. या नंतर रिझव्‍‌र्ह बँकेने खातेदारांच्या तातडीने पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. त्याविरोधात खातेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत विविध याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये रिझव्‍‌र्ह बँकेला पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. न्यायालय सध्या या प्रकरणी याचिकाकर्ते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांचा अंतिम युक्तिवाद ऐकत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या याचिकाकेमध्ये उच्च न्यायालयाने खातेधारकांना पुन्हा एकदा चपराक लगावली आहे.

दरम्यान पीएमसी बँक गैरव्यवहाराप्रकरणी खातेधारकांना होत असलेल्या त्रासासाठी रिझव्‍‌र्ह बँकच जबाबदार आहे. शिखर बँकेच्या निष्काळजीपणामुळेच खातेधारकांचे पैसे बुडाले, असा आरोप करणाऱ्या खातेधारकांनी केला होता. यावरून ”रिझव्‍‌र्ह बँकेला दोष देऊ नका, याचा पुनरूच्चार करताना रिझव्‍‌र्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप केला नसता आणि पैसे काढण्याच्या मर्यादेवर निर्बंध घातले नसते तर खातेधारकांना आणखी नुकसान सहन करावे लागले असते. असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान बुधवारी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालय गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेचा युक्तिवाद ऐकणार आहेत.

Leave a Comment