वेगाने बस चालवणाऱ्या चालकांना वेसण!! PMPML चे स्पीड 50 वर होणार लॉक

PMPML Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PMPML बस ही पुणे शहराची (Pune City) शान मानली जाते. त्यातून अनेक प्रवासी प्रवास करतात. पुणेकरांच्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग आहे. परंतु येत्या काळात गाड्यांच्याअपघाती संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासनाने PMP चा वेग हा प्रतितास 50 किलोमीटरवर ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे भरधाव वेगात बस चालवणाऱ्या चालकांना कुठंतरी वेसण बसली असं म्हणायला काही हरकत नाही. पीएमपीच्या चालकाचा गाडी चालवण्याचा वेग प्रचंड वाढला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चालकाला नक्कीच लगाम बसेल. अशी अशा व्यक्त केली जात आहे.नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

आतापर्यंत किती झाले अपघात?

मागच्या तीन वर्षांपासून अपघाताचा आकडा हा चांगलाच वाढला आहे. तो पुढीलप्रमाणे :

2023 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात एकूण 75 अपघात झाले असून 19 जणांनी आपला जीव गमवला आहे. तर 73 जण जखमी झाले होते.

एप्रिल 2022 ते मार्च 2023 – 133 एवढा अपघाताचा आकडा असून त्यात 22 जणांचा मृत्यू तर 151 जखमी झाले होते. तर,

एप्रिल 2021  ते मार्च 2022 मध्ये एकूण 79 अपघात तर 18 मृत्यू आणि 52 जखमी झाले होते. त्यामुळे ह्यावर उपाय म्हणून पुणे प्रशासनाने PMP चा वेग हा 50 वरती लॉक केला आहे.

बसचा सादर करावा लागणार अहवाल

प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. ह्या निर्णयानुसार आता बसेसची वेग मर्यादा लॉक केल्यानंतर त्या बसेसचा अहवाल द्यावा लागणार आहे. तो अहवाल हा वाहतूक व्यवस्थापक यांना सादर करावा लागणार आहे.  ह्या नियंत्रणामुळे नागरिकांचा प्रवास हा नक्कीच सुखकर होईल असे म्हणायला हरकत नाही. तसेच येणाऱ्या काळात पुण्यातील अपघातांचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते.