आणि पीएमटी बस मधून धुराचे लोट निघू लागले

0
95
PMT Bus
PMT Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । अमित येवले

येथील लक्ष्मी रोड वर दुपारी एकच्या सुमारास पीएमटी बस मधून अचानक धुर निघू लागल्याने प्रवाशांनमधे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने नुकत्याच खरेदी केलेल्या पीएमटी बसमधे असा बिघाड झाल्याने धुराचे लोटच्या लोट बस मधून निघु लागले. यामुळे लक्ष्मी रोड वरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. तसेच नागरीकांमधे भीतीचे वातावरण पसरले होते.

तुकाराम मुंढे गेल्यापासून पीएमटी चा कारभार हा ढिसाळ पद्धतीने सुरू असून आज त्याचे उदहारण समोर आले आहे. ब्रेकडाउन चे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढून याचा मोठा फटका पीएमटीला बसत आहे. नागरीकांकडून नेहमीच टीकेचा विषय होणारी पीएमटी यामुळे पुन्हा एकदा टर्गेट झाली.

व्हिडीओ : प्रवीण भोई

आणि बस मधुन अचानक धुराचे लोट निघू लागले..| PMPML | Pune Transport

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here