हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्वेलर ब्रँड पैकी एक असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा IPO उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला बाजारात लिस्ट (PN Gadgil Jewellers IPO) होणार आहे. IPO हा 850 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचे संयोजन आहे. 10 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि 12 सप्टेंबर रोजी बंद होईल असं कंपनीने सांगितलं आहे. हा आयपीओ ११०० कोटींचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय.
किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल? PN Gadgil Jewellers IPO
पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी IPO च्या माध्यमातून 22,916,667 इक्विटी शेअर्स विकणार आहे. यातील 850 कोटी रुपयांचे 17,708,334 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 250 कोटी रुपयांचे 5,208,333 इक्विटी शेअर्स विकले जातील. किरकोळ गुंतवणूकदारांना हा आयपीओ खरेदी करायचा असेल तर कमीत कमी 31 शेअर्सचा एक लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच सुमारे 14,880 रुपयांचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतील. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप १३ सप्टेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील. (PN Gadgil Jewellers IPO)
सध्या, PN गाडगीळ ज्वेलर्समध्ये SVG बिझनेस ट्रस्टचा 99.9 टक्के हिस्सा आहे. ब्रोकरेज हाऊसेसने इश्यूनंतर कंपनीचे बाजार भांडवल 6,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ताज्या इश्यूमधून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे 393 कोटी रुपये महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी खर्चासाठी खर्च केले जातील, 300 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि काही भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल असं बोललं जातंय. दरम्यान, पु.ना.गाडगीळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑर्गनाईज्ड ज्वेलर्स आहेत. डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार त्यांचे महाराष्ट्र आणि गोव्या ३३ स्टोअर्स आहेत. तसंच अमेरिकेतही एक स्टोअर आहे.