PNB Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन असतो. ज्याचा फायदा अनेकांना होत असतो. आता बँकेत नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पंजाब नॅशनल बँक (PNB Bharti 2024) अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 2700 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 30 जून 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तसेच 14 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायला सुरुवात करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
महत्त्वाची माहिती | PNB Bharti 2024
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 2700 जागा
- वयोमर्यादा – किमान 20वर्षे आणि कमाल 28 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- निवड प्रक्रिया – ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2024
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराची पदवी परीक्षा पास असणे गरजेचे आहे
अर्ज कसा करावा? | PNB Bharti 2024
- त्या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 14 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा