हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक बँकेच्या पीएनबी One App किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करता येईल. इतकेच नाही तर पीएनबी One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज केल्यास व्याजावर 0.25% सूट देण्याची घोषणाही बँकेकडून करण्यात आली आहे.
इथे हे लक्षात घ्या कि, ओव्हरड्राफ्ट हा कर्जाचाच एक प्रकार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या बँक खात्यातून चालू शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येतील. मात्र हे अतिरिक्त पैसे ठराविक कालावधीत परत करावे लागतील. तसेच त्यावर व्याजही द्यावे लागेल. यामध्ये ग्राहकांना तुलनेने कमी व्याज द्यावे लागेल. यामधील दुसरा फायदा असा की, ज्या वेळेसाठी ओव्हरड्राफ्टमध्ये पैसे घेतले जातात तेवढेच व्याज द्यावे लागेल.
बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की, फिक्स्ड डिपॉझिटवरील ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. बँकेच्या पीएनबी One App आणि रिटेल इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्ज करून ग्राहकाला या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
PNB कडून प्री-क्वालिफाईड कार्ड लाँच
PNB ने प्री-क्वालिफाईड क्रेडिट कार्ड देखील लॉन्च करण्यात आले आहेत. इन्शुरन्स सहित अनेक फीचर्सनी सुसज्ज असलेले हे कार्ड सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. यासाठी PNB One App आणि इंटरनेट बँकिंग सर्व्हिसद्वारे अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/online-overdraft-facility.html
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजच्या किंमती तपासा !!!
PNB देत आहे स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची कमान राधाकिशन दमानी हाती !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!