हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pneumonia) कोणत्याही संसर्गाचा फैलाव वाढला की सर्वात आधी पालकांची चिंता वाढते. कारण लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा फैलाव लवकर होतो. मातीत खेळणे, जखमा होणे, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ न करणे अशा गोष्टींमुळे लहान मुलं आजारी पडतात. कितीही लक्ष दिले तरी बदलते हवामान मात्र मुलांच्या तब्येतीवर लगेच परिणाम करतं. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार लहान मुलांना वारंवार होताना दिसतात. मात्र या आजरांमुळे मुलांची इम्युनिटी पावर कमी होऊ लागते. परिणामी एखाद्या जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढले तर मुलांच्या तब्येतीवर आधी परिणाम होतो.
सध्या राज्यभरात अशाच एका संसर्गजन्य आजराचा वेगाने फैलाव होतो आहे. (Pneumonia) नुकताच पुण्यासारख्या महत्वाच्या शहरासह राज्यभरातील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. पुण्यातील प्रत्येक रुग्णालयांत न्यूमोनियाचे (Pneumonia) ५- ६ रुग्ण दाखल असल्याचे समोर आले आहे. अशा वातावरणात आपल्या मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच न्यूमोनियाविषयी महत्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तत्पूर्वी न्यूमोनिया म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ. त्यासोबत न्यूमोनियाची लक्षणे देखील जाणून घेऊया.
‘न्यूमोनिया’ म्हणजे काय? (Pneumonia)
फुफ्फुसात विषाणू, बॅक्टेरिया (जीवाणू) किंवा बुरशीमुळे झालेला संसर्ग म्हणजे ‘न्यूमोनिया’ होय. बोलीभाषेत सांगायचे झाले तर, फुफ्फुसात पाणी होणे असे म्हटले जाते. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. ज्याची काही महत्वाची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. अन्यथा मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. न्यूमोनियाचा संसर्ग हा काही प्रकरणांमध्ये सौम्य तर काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो.
न्यूमोनिया झाल्यास काय होते?
न्यूमोनियाने संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसातील पेशींना सूज यते. आपल्या फुफ्फुसात हवेच्या छोट्या-छोट्या पिशव्या अर्थात ‘अल्वेओली’ असतात. ज्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यास न्यूमोनिया होतो. (Pneumonia) अल्वेओली या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांसोबत ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईडची देवाण- घेवाण करते. यातून ‘अल्वेओली’ साठवलेला ऑक्सिजन आपल्या शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाठवण्याचे कार्य करतात. त्यामुळे न्यूमोनियाने संक्रमित झाल्यास वेळीच उपचार घेणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया न्यूमोनियाची लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखावी?
न्यूमोनियाची मुख्य लक्षणे
न्यूमोनिया हा असा जंतुसंसर्ग आजार आहे जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यपणे न्यूमोनियाने संक्रमित व्यक्तींमध्ये खालील लक्षणे आढतात.
- श्वासोच्छवासात अडथळा जाणवणे
- जोरजोरात श्वास घेणे
- धाप लागणे
- हृदयाच्या ठोक्यांचे अचानक प्रमाण वाढणे
- अंगात थंडी वा ताप भरणे
- सतत खूप घाम येणे
- छातीत दुखणे
- कफ साठणे
- नॉशिया किंवा उलट्या होणे
- पोटात मळमळणे किंवा डायरिया
‘न्यूमोनिया’चा प्रसार कसा होतो?
WHO ने सांगितल्याप्रमाणे, हा आजार विविध कारणांमुळे पसरण्याची शक्यता असते. याचे जिवाणू, विषाणू लहान मुलांच्या नाकात आणि घशात असतात. हे जंतू फुफ्फुसात शिरकाव केल्यास संसर्ग निर्माण करतात. तसेच खोकला किंवा कफमुळेदेखील हवेतून लहान ड्रोपलेट्समधून या जंतूंचा प्रसार होतो. (Pneumonia)