हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने भारतीय बाजारात POCO C61 Airtel Edition हा नवीन आणि परवडणारा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी,4GB रॅम आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. अतिशय कमी किंमत असल्याने भारतीय मार्केट मध्ये हा स्मार्टफोन नक्कीच धुमाकूळ घालेल यात शंका नाही. आज आपण या मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात….
काय फीचर्स मिळतात?
POCO C61 Airtel Edition मध्ये 90Hz रिफ्रेश सह 6.71-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये MediaTek G36 चिपसेट बसवण्यात आली असून 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय. मोबाईल मध्ये प्राथमिक कॅमेरा 8MP आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलच्या वर गोलाकार रेडियंट रिंग डिझाइन वापरण्यात आली ज्यामुळे मोबाईलला आकर्षक लूक मिळतोय. मात्र याठिकाणी हि एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा एक 4G मोबाईल असून 5G ला सपोर्ट करत नाही. तसेच यामध्ये फक्त एअरटेल प्रीपेड सिमकार्ड चालेल. जिओ, वोडाफोन- आयडिया किंवा अन्य कोणत्याही सिमकार्डला हा मोबाईल सपोर्ट करत नाही.
किंमत किती? POCO C61 Airtel Edition
POCO C61 Airtel Edition ची Flipkart वर किंमत 5,999 रुपये आहे. POCO C61 Airtel Edition वर 7.5 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, जी 750 रुपयांपर्यंतची सूट असेल. एवढच नव्हे तर हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 50GB डेटा मोफत मिळणार आहे. POCO चा हा स्मार्टफोन मिस्टिकल ग्रीन, इथरियल ब्लू आणि डायमंड डस्ट ब्लॅक या तीन कलर व्हेरियंटमध्ये येतो.