POCO C71 Launched। तुम्ही जर अगदी कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता POCO ने आपल्या ग्राहकांसाठी फक्त 6,499 रुपयांत नवा मोबाईल लाँच केला आहे. POCO C71 असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 32 MP कॅमेरा, 5,200mAh बॅटरी यांसारखे अनेक दमदार फीचर्स मिळतात. प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर ८ एप्रिलला या मोबाईलची पहिली विक्री सुरु होईल. आज आपण पोकोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..
6.88 इंचाचा डिस्प्ले –
POCO C71 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1,640 पिक्सल रिझोल्युशन सह येतोय. यामध्ये 600 निट्स ब्राइटनेस, 240Hz टच सैंपलिंग रेट आणि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन मिळतेय. कंपनीने मोबाईल मध्ये Unisoc T7250 प्रोसेसर बसवला आहे. त्यानुसार मोबाईल मध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB तक स्टोरेज मिळते. पोकोचा हा स्मार्टफोन एंड्रॉयड 15वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. कंपनीकडून मोबाईलवर २ वर्षांचे ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळतील.
कॅमेरा – POCO C71 Launched
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, POCO C71 मध्ये ३२-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये ५,२००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी १५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय, GPS, ब्लूटूथ 5.2, USB टाइप-सी आणि 3.5mm ऑडिओ जॅक सारखी वैशिष्ट्ये आहेत.
किंमत किती?
POCO C71 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7,499 रुपयांना मिळेल. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या मोबाईलची विक्री सुरू होईल. हा स्मार्टफोन गोल्ड, निळा आणि काळ्या रंगात लाँच (POCO C71 Launched) करण्यात आला आहे. तुम्हाला कमी पैशात स्वस्तात मस्त आणि स्टायलिश मोबाईल हवा असेल तर पोकोचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट पर्याय ठरेल.