POCO F6 5G : 12GB रॅम , 50MP कॅमेरासह POCO ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने भारतीय बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. POCO F6 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 12GB रॅम , 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. येत्या २९ मे ला फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज आपण पोकोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

6.67 इंचाचा डिस्प्ले –

POCO F6 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा WQHD+ Flow AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने मोबाइलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. हा स्मार्टफोन एकूण ३ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आलाय. यामध्ये 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेजचा समावेश आहे.

कॅमेरा – POCO F6 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास POCO F6 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतोय. यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 120W USB टाइप C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

जस आम्ही तुम्हाला सांगितलं कि पोकोचा हा स्मार्टफोन ३ स्टोरेज मध्ये लाँच करण्यात आलाय, त्यानुसार त्याची किंमत सुद्धा वेगेवेगळी आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे, 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 31,999 रुपये आहे तर 12GB RAM + 512GB स्टोरेज हँडसेटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या 29 मे रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सेलमध्ये मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 2,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. एवढेच नाही तर पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना 1 वर्षाची एक्स्टेंडेड वॉरंटी देखील दिली जात आहे.