Poco M6 Plus 5G : 108MP कॅमेरासह Poco ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; किंमत किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Poco चे मोबाईल हे त्याच्या स्वस्त किमतीसाठी ओळखले जातात. इतर कंपन्यांच्या तुलनेत पोकोचे स्मार्टफोन कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे मोबाईल खरेदी करत असतात. याच पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक कमी बजेट मधील मोबाईल लाँच केला आहे. Poco M6 Plus 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल अवघ्या 11,999 रुपयांत लाँच करण्यात आलाय. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….

6.79 इंचाचा डिस्प्ले –

Poco M6 Plus 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 550Nits पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. संरक्षणासाठी डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळते. कंपनीने आपल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 AE चिपसेट वापरली असून पोकोचा हा मोबाईल Android 14 आधारित HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा – Poco M6 Plus 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Poco M6 Plus 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,030mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. या मोबाईलसोबत कंपनीने 2 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट दिलेत.

किंमत किती?

Poco M6 Plus 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये आहे. SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळतेय.