हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Poco ने आपल्या स्मार्टफोन सीरीज X वाढवला आहे. कंपनीने आता नवीन POCO X5 सिरीज अंतर्गत POCO X5 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला 108MP चा कॅमेरा मिळतोय तर याची बॅटरी 5000mAh आहे. आज आपण जाणून घेऊया POCO च्या या नव्या मोबाईलची खास वैशिष्ट्ये आणि त्याच्या किमतीबाबत….
6.67-इंच डिस्प्ले –
POCO X5 Pro 5G ला 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश 120 Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटच्या सपोर्टसह येतो. ग्राफिक्ससाठी, यामध्ये Adreno 642L GPU देखील सपोर्ट आहे.
108MP कॅमेरा – Poco X5 Pro 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास POCO X5 Pro 5G हा हँडसेट ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी मोबाईलला 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
अन्य फीचर्स –
मोबाईलच्या अन्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झाल्यास Poco X5 Pro 5G मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1, एक IR ब्लास्टर आणि X-axis लिनियर मोटर यांसारखे फीचर्स मिळतात. याशिवाय मोबाईल मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकसाठी सपोर्ट आहे.
किंमत किती –
कंपनीने Poco X5 Pro 5G दोन व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केला आहे. यातील 6GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 22,999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 24,999 रुपये आहे. हा हँडसेट Astral Black, Horizon Blue आणि Poco Yellow कलर पर्यायांसह उपलब्ध आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करायचा असेल तर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.