औरंगाबाद | उस्मानपुरा भागातील छोटा मुरलीधरनगर येथील रहिवासी विकास सुभेसिंग लाहोट यांच्या दोन पाळीव डुकरांना दि.१५ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान विष देऊन मारण्यात आले. याबाबत वेदांतनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे.
विकास सुभेसिंग लाहोट हे वराह पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यांची दोन पाळलेली डुकरे होती. दि. १५ मार्च रोजी बजाज भवनच्या समोर दोन्ही डुकरांना विष दिल्यामुळे ती मेली. विकास लाहोट यांना याबाबत छोटा मुरलीधर नगर येथील रहिवासी नर्सि जुनी या व्यक्तीवर संशय असून त्या व्यक्तीला या पूर्वी आम्ही जनावरे चोरतांना पकडले आहे. तसेच त्याने गेल्या सहा महिन्यांत ७० ते १०० जनावरांना विष देऊन मारल्याचे त्यानी सांगितले.
डुकराला विष पाजले त्या भागात अनेक कॅमेरे आहेत आणि त्या कॅमेऱ्यांच्या व्हिडीओ ची तपासणी केली तर विष पाजणाऱ्या व्यक्ती ची ओळख पटू शकते. अशाच प्रकारे जनावरे मरत राहिली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे संशयित व्यक्तीवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विकास लाहोट यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.