भारतीय हद्दीत घुसलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुकी हैदर होते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरमधे पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर बसले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्चचर संस्था आयएसआयने हैदर यांच्या हत्येचा कट रचला होता अशी शंका वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हेलिकॉप्टर चुकून भारतीय सीमेत घुसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानचे एक पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मिरच्या पुंछ जिल्ह्यात आज दुपारी १२:१३ वाजता आढळून आले. हेलिकॉप्टर आढळून येताच लष्कराने हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर ते तातडीने माघारी फिरले.
कुठल्याही देशाचं हेलिकॉप्टर दुसऱ्या देशाच्या हद्दीत आले तर ते लष्कराकडून पाडले जावू शकते. आता या हेलिकॉप्टरमध्ये पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर होते अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या एटीएस ने हेलिकॉप्टरला चुकीची दिशा दाखवली त्यामुळे ते भारतीय हद्दीत आले असे म्हटले जात आहे. त्यामुळे लष्कराने कारवाई केली तर ते हेलिकॉप्टर पाडले जाईल आणि त्यात हैदर यांचा मृत्यू होईल असा डाव असू शकतो अशी शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.

हवाई नियंत्रण करणारी यंत्रणा एटीएस अशी चूक करणार नाही. ही चूक नसून मुद्दाम हेतूपरस्पर करण्यात आलेली कृती होती असेही म्हटले जात आहे. पाक व्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अनधिकृत ताबा असून तो भाग भारताचाच असल्याचा आपला दावा आहे. तिथले सरकार आणि पाकिस्तान सरकारमध्ये नेहमी शितयुद्ध सुरू असते. अशा पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर यांची हत्या करण्याचा आयएसआयचा डाव असू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment